team-notinclude

आम्ही आपले सहर्ष स्वागत करीत आहोत !!!

पतसंस्थेची स्थापना दि. १६/१२/२००५ रोजी सहाय्यक निबंधक कार्यालय, गडचिरोली इथून नोंदणी झाली असुन या पतसंस्थेचे सांकल्पिक तत्व सहकार खात्यावर असुन गडचिरोली नगरपरिषद क्षेत्रात एक छोटी पतसंस्था सुरू करायची अत्यंत प्रतिकुल व त्याच परिस्थितीत असलेल्या माझ्या काही सहकारी मित्रांसमोर विषय मांडून त्या विषय सखोल चर्चा करून सहकारी मित्रांच्या सहकार्याने व त्यांच्या पाठींब्याने सहकारी पतसंस्था उभारण्यात सुरूवात केली व त्या काही जेष्ठ अनुभवी तज्ञ लोकांचा सल्ला व मार्गदर्शन घेऊन. गृहलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित; गडचिरोली र. नं. ३१६ ची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करणे . बचतीची सवय लावणे तसेच बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच ज्या सभासदांचे समाजात स्थान नाही. अशा सभासदांना समाजात स्थान मिळवून देणे. अशा अनेक प्रकारचे उददेश ठेवून संस्था पुढील वाटचाल करीत आहे. भारतातील इतर राज्या पेक्षा महाराष्ट्रातील सहकारी चळवळ ही अग्रेसर आहे. त्यामुळे सहकारी संस्थांची संख्या व व्यवहार वाढले आहे.

गृहलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे आर्थिक लेखापरिक्षण संस्था नोंदणी पासुन सतत ‘अ’ वर्ग आहे. व संस्थेला सन २०१६ मध्ये गडचिरोली जिल्हा पगारदार कर्मचारी व नागरी तथा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था संघ मर्या; गडचिरोली र. नं. १०३ कडून उत्कृष्ट सहकारी पतसंस्था जिल्हा सहकार पुरस्कार -२०१६ करिता गडचिरोली तालुक्यातून प्रथम पुरस्कार निवड करून सन्मानीत केले आहे. गृहलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे सतत वाढत्या व्यापाचा कारभार कार्यक्षमपणे होणे आगत्याचे आहे. सृजनात्मक उद्देश व सकारात्मक उद्दिष्टपूर्तीचा ध्यास घेऊन आजपर्यंत संस्थेतील संस्थेतील सर्व संचालक मंडळाने, कर्मचाऱ्याने व अभिकर्ता वर्ग सातत्याने कामकरीत असल्यामुळेच संस्था आज यशाचे शिखर गाठत आहे . व संस्थेला यशाचे शिखर गाठण्याकरिता सर्व सभासदांचे, व ठेवीदारांचे, कर्मचाऱ्यांचे, अभिकर्त्यांचे व हितचिंतकांचे सहकार्य अपेक्षित आहे..

धन्यवाद....!

संस्थापक व मार्गदर्शक

मा. श्री. भास्कर रा. खोये